हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

गडचिरोली : हरित क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ११० व्या जयंतीचा कार्यक्रम ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेश सचिव तथा नागपूर विभागाचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली दि.१ जुलै २०२३ रोजी पार पडला.

या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनपटावर व महाराष्ट्रात दुष्काळासारख्या बिकट परिस्थितीत केलेल्या उत्कृष्ट कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला बंजारा समाजातील बंधूभगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य सुनील राठोड, ओम पवार, संजय राठोड,
रायसिंग राठोड, चरणसिंग राठोड, डॉ.निखिल चव्हाण, विशाल चव्हाण, गुलाबसिंग राठोड, गजानन कत्रोजवार यांनी केले. संचालन सुनील राठोड तर आभार प्रदर्शन ओम पवार यांनी केले.