गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा बी-फॅशन मॅालमध्ये शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मॅालचे संचालक मनोज देवकुले आणि परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी व्यापारी संघटनेचे रवी चन्नावार, गुरूदेव हरडे यांच्यासह अनेक व्यापारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर प्रामुख्याने उपस्थित होते.