काँग्रेसने नारेबाजी करत केले भाजपच्या विरोधात निषेधात्मक आंदोलन

राहुल गांधी यांच्या बदनामीचा आरोप

गडचिरोली : भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत असल्याने त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न, तर कधी विविध उपाध्या लावून भाजपकडून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत गडचिरोली जिल्हा काँग्रेसने भाजपचा निषेध केला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सहकार सेलचे अध्यक्ष अब्दुल पंजवाणी, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष संजय चन्ने, शिक्षक सेलचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, याशिवाय हरबाजी मोरे, अनिल कोठारे, लालाजी सातपुते, मनोहर नवघडे, प्रभाकर कुबडे, निकेश कामीडवार, पुरुषोत्तम सिडाम, सुभाष धाईत, कमलेश खोब्रागडे, बंडोपंत चिटमलवार, प्रफुल आंबोरकर, माजिद सय्यद, सदाशिव कोडापे, उत्तम ठाकरे, मिलिंद बारसागडे, बाबुराव गडसूलवार, योगेश लांजेवार, सुधीर बांबोळे, मनोज उंदीरवाडे, नितेश राठोड, जावेद खान, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, कल्पना नंदेश्वर, रिता गोवर्धन यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.