राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत रविवारी महिला सशक्तीकरण अभियान

रविवारी पोर्ला येथे होणार कार्यक्रम

गडचिरोली : राज्यपाल रमेश बैस येत्या रविवार, दि.१० डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीत पोर्ला येथे विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महिला सशक्तीकरण अभियानाचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खा.अशोक नेते, आ.कृष्णा गजबे, आ.डॅा.देवराव होळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध विभागाच्या लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमस्थळी सर्व विभागांच्या योजनांचे स्टॉल राहतील. प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी संजय मीना, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक फरेंद्र कुत्तीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज, तहसीलदार महेंद्र गणवीर, गटविकास अधिकारी धनंजय साळवे आदी अधिकाऱ्यांनी पोर्ला येथे पाहणी करून कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला ७ ते ८ हजार लोकांची उपस्थिती राहील, असे नियोजन केले जात आहे.