गडचिरोलीत विजय दिवसानिमित्त भर पावसात कारगिल शहिदांना आदरांजली

अनेक मान्यवरांनी लावली हजेरी

गडचिरोली : पाकिस्तानी आक्रमणकर्त्यांना हुसकावून लावत कारगिलची लढाई जिंकल्याची आठवण म्हणून २६ जुलै रोजी देशभरात विजय दिवस पाळला जातो. येथील आठवडी बाजारानजिकच्या कारगिल चौकात उभारण्यात आलेल्या कारगिल स्मारकाच्या ठिकाणी विजय दिवसानिमित्त यावर्षी भर पावसात अनेक मान्यवरांनी शहीद कारगिलविरांना आदरांजली वाहिली.

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॅा.नामदेव किरसान, डॅा.नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक, युवक यावेळी उपस्थित होते.

गडचिरोली शहरात मागील २४ वर्षापासून कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या नेतृत्वात विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्यांच्याच पुढाकाराने जिल्हा निधीतून या कारगिल स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, मार्गदर्शक नरेंद्र चन्नावार, सुनील देशमुख, डॉ.नरेश बिडकर, दिलीप माणुसमारे, विलास जुवारे, सुनील बावणे, निखिल मंडलवार, विजय लोणार, रुपेश सलामे, महेंद्र मसराम, राजू डोंगरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.