गडचिरोली : मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) इंदिरा गांधी चौकात मौन निषेध नोंदविला. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर काळ्या फिती लावून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसले होते.
मणिपूरमध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुःखद घटना आहे. राज्यात दोन समाजामध्ये वाढलेला तणाव लक्षात घेऊन मणिपूर राज्य सरकारतर्फे यापूर्वीच योग्य उपाययोजना आणि कठोर कारवाई करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले. मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संवेदनशील परिस्थिती असताना देखील, केंद्र व मणिपूर राज्य सरकारने मौन बाळगलेले आहे. देशामध्ये महिलांवरील अत्याचार वाढत चालले असून, कुणालाही कायद्याची भिती राहिलेली नाही हे वारंवार घडणाऱ्या काही घटनांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे देशातील सर्व महिलावर्गामध्ये तीव्र असंतोष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा अन्याय व अत्याचाराच्या विरोधात असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी हा निषेध पाळण्यात येत असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी सांगितले.
या निषेध आंदोलनप्रसंगी पक्षाचे प्रदेश चिटणीस अँड.संजय ठाकरे, शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा सरचिटणीस संजय कोचे, नईम शेख, अशोक माडावार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अमर खंडारे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला रामटेके, माजी नगरसेविका संध्या उईके, मिनल चिमुरकर, रायुकाँचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, युवक शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, तालुका सेवादल अध्यक्ष सुनील कत्रोजवार, शहर सेवादल अध्यक्ष मल्लया कालवा, महिला निरीक्षक आरती कोल्हे, उमा बनसोड, महिला जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा पवार, महिला राकाँच्या तालुकाध्यक्ष निता बोबाटे, रमेश बनसोड, नागोराव उईके, सुनील चिमुरकर, सुरेश जोंधळे, अतुल नैताम, विजय जाधव, शाहरुख पठाण, रेखा कोराम, विवेक चंदनखेडे, सुभाष धाईत, आशा मेश्राम, सुनिता सेलोकर, वंदना चंद्रगिरेवार, जयनब शेख, गणेश मेश्राम, जिब्राईल शेख, राहुल कोसरे, हरीश कुमरे , राकेश गुरूनुले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.