अन् लॅायड्स मेटल्सच्या व्यवस्थापकानी महिलांच्या पायावर ठेवलं डोकं

असं काय झालं त्यावेळी? पहा हा व्हिडीओ

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम बुधवारी जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. आदिवासीबहुल जिल्हा असल्याने गडचिरोली शहरासोबत ग्रामीण भागातही या दिवसाचा उत्साह दिसत होता. बहुसंख्य आदिवासी समाज असणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरच्या लोहखाणीत यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी लॅायड्स कंपनीच्या व्यवस्थापकांनी अचानक उपस्थित ज्येष्ठ महिला कामगारांच्या पायावर डोकं ठेवून सर्वांनाच आश्चर्यात टाकले.

लॅायड्स मेटल्सच्या वतीने कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि कामावरील कामगारही या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला सुरूवात करण्याआधी भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंचे पूजन करण्यात आले. कंपनीचे तरुण व्यवस्थापक साई कुमार यांच्यासह उपस्थित महिला कामगारांनीही पुजन केले. त्यानंतर अचानक साई कुमार यांनी तिथे उपस्थित ज्येष्ठ महिला आणि कामगारांच्या पायावर डोकं ठेवत त्यांचे आशीर्वाद घेतले.

क्षणभर साहेब काय करत आहेत हे महिलांना कळलेच नाही. पण साई कुमार यांनी शुभकार्याची सुरूवात ज्येष्ठ लोकांचे आशीर्वाद घेऊन करतात. म्हणून आपण नमस्कार करत असल्याचे सांगितले. यानंतर त्या महिलांनी त्यांना हृदयातून आशीर्वाद दिले. साई कुमार यांची ही कृती उपस्थित कामगार आणि कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय झाली.

जागतिक आदिवासी दिवसाच्या या कार्यक्रमाला लॅायड्स मेटल्सचे ऑपरेशन हेड जीवन हेडाऊ, गणेश शेट्टी, संजय चांगलानी आणि खाण परिसरातल्या गावातील जेष्ठ मंडळी, कामगार उपस्थित होते.