लांझेडात रंगले रात्रकालीन कबड्डी सामने, संताजी क्रीडा मंडळाचे आयोजन

खा.अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली : शहरालगतच्या लांझेडा भागात श्री संत संताजी जगनाडे महाराज क्रीडा कबड्डी मंडळाच्या सौजन्याने रात्रकालीन खुल्या कबड्डी सामन्यांचे आयोजन एकनाथ नैताम यांच्या पटांगणात करण्यात आले. या सामन्यांचे उद्घाटन खा.अशोक नेते यांनी फित कापून केले.

यावेळी मार्गदर्शन करताना खा.नेते म्हणाले, मी विद्यार्थी जीवनात कबड्डी व रनिंगचा खेळाडू होतो. युवकांनी हसतमुखाने आणि वादविवाद न करता कबड्डीचे सामने खेळावे. यावेळी त्यांनी मैदानात टॉस करत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी आरमोरी विरूद्ध खरपुंडी यांच्यातील पहिल्या सामन्याचा आनंद त्यांनी घेतला. या स्पर्धेत १६ चमुंनी सहभाग घेतला आहे.

यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, स्पंदन फाउंडेशनचे संस्थापक डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे सचिव अनिल कुनघाडकर, कामगार आघाडीचे नेते गोवर्धन चव्हाण, पो.पा. भास्कर कोठारे, सामाजिक कार्यकर्ते संजय मांडवगडे, गटशिक्षणाधिकारी अमरसिंग गेडाम, गजानन नैताम, नरेंद्र भांडेकर, अविनाश कुकुडकर, प्रदीप भांडेकर, संजय भांडेकर, मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र नैताम, किशोर सोमनकर, जितू चलाख, मंगेश वैरागडे, विक्की नैताम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.