कल्पतरू बहुउद्देशिय संस्था आणि रायुकाँ देणार पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

जिल्ह्यातील युवक-युवतींना संधी

गडचिरोली : कल्पतरू बहुउद्देशिय संस्थेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त ही संस्था आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवक-युवतींना नि:शु्ल्क भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. होऊ घातलेल्या पोलिस आणि राज्य राखीव पोलिस बलाच्या भरतीसाठी हे प्रशिक्षण कामी येणार आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर आणि कल्पतरू संस्थेच्या वतीने शितल गेडाम व अरविंद शेडमाके यांनी याबद्दलची माहिती पत्रपरिषदेत दिली. या प्रशिक्षणात अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. पहाटे 5.30 ते 7.30 यादरम्यान जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेवर शारीरिक क्षमता चाचणी प्रशिक्षण, तर सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 6 ते 8 लेखी परीक्षेवर मार्गदर्शन वर्ग चालणार आहेत. हे प्रशिक्षण 60 दिवस चालणार आहे.

11 मार्चपासून सुरू होणाऱ्या या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी 10 मार्चपर्यंत कल्पतरू अॅकेडमी, सावकार कॅाम्प्लेक्स, धानोरा रोड गडचिरोली किंवा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यालय, राधे बिल्डिंगसमोर, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर आणि कल्पतरू संस्थेचे अध्यक्ष कृणाल पडलवार यांनी केले आहे.