देसाईगंज : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुरुड येथील केंद्रीय कन्या शाळा आणि मुलांच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत नोटबुक व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव मनोज ढोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. देसाईगंजच्या महिला तालुकाध्यक्ष पुष्पा कोहपरे, कुरुड गावच्या सरपंच प्रशाला अविनाश गेडाम यांच्या हस्ते हा उपक्रम मंगळवारी (दि.१२) करण्यात आला.
कार्यक्रमाला काँग्रेस नेते विजय कुंभलवार, युवा नेते गणेश भोयर, महिला तालुका उपाध्यक्ष करेजा शेख, महिला कोषाध्यक्ष जयारा शेख, काँग्रेस कमिटीच्या महिला गाव अध्यक्ष रीना शेंडे, महिला उपाध्यक्ष दीपाली सोनबावने आणि केंद्रीय कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री मिसार, स.शिक्षिका किरण ठाकरे, रश्मी चांदेकर, प्राथमिक मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका वर्णीका हजारे, शिक्षक दिवाकर ढवळे, शिक्षिका मनिषा प्रधान व कार्यकर्ते उपस्थित होते.