धोबी समाज संघटनेतर्फे कर्मयोगी संत गाडगेबाबांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

गडचिरोलीच्या गांधी चौकात कार्यक्रम

गडचिरोली : महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा तसेच शिक्षण व स्वच्छतेवर आयुष्यभर प्रबोधन करणारे निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या 67 व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

न.प.चे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून पुजन करण्यात आले.

यावेळी धोबी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष आकानुरवार, जिल्हा सचिव मोरेश्वर मानपल्लीवार, युवक जिल्हाध्यक्ष प्रभू रोहनकर, महिला जिल्हाध्यक्षा अनिता कोल्हटवार, उपाध्यक्ष मंगला केळझरकर, पी.जी. राहूलवार, दिवाकर ताजने, भास्कर केळझरकर, विलास केळझरकर, गजानन कुद्रकवार, अरविंद मादेशवार, तालुका अध्यक्ष राजू कंठीवार, तृप्ती गोरडवार, सुनंदा गोरडवार, वैशाली ताजने, विकास तरमनवार, नितीश केळझरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले . या कार्यक्रमासाठी अतुल केळझरकर, प्रमोद ताडपल्लीवर, किशोर केळझटकर, अमर दावनपल्लिवार, अनिल म्हाशाखेत्री, यश ताजने आदींनी परिश्रम घेतले.