गडचिरोली प्रेस क्लबच्या कार्यकारिणीला एक वर्षाकरिता मुदतवाढ

अध्यक्ष काथवटे, सचिवपदी पटले कायम

गडचिरोली : गडचिरोली प्रेस क्लबच्या वार्षिक आमसभेत वर्ष २०२३ मधील कार्यकारिणीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे अध्यक्षपदी नंदकिशोर काथवटे, तर सचिवपदी निलेश पटले कायम आहेत.

गडचिरोली प्रेस क्लबची वार्षिक आमसभा रविवार दि.१७ डिसेंबर रोजी प्रेस क्लब भवनात पार पडली. यात सन २०२३ मध्ये केलेल्या कामाचा व जमाखर्चाचा आढावा घेऊन २०२४ साठी जुनीच कार्यकारिणी कायम ठेवण्यात आली. त्यात उपाध्यक्ष अनिल धामोडे, सहसचिव रुपराज वाकोडे, कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर, सदस्य सुरेश पद्मशाली, रोहीदास राऊत, सुरेश नगराळे, शेमदेव चाफले, विलास दशमुखे, मिलींद उमरे, मनोज ताजने यांचा समावेश आहे.