सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांमध्ये अभिवादन

फुले प्रतिष्ठान अभ्यासिकेचे उद्घाटन

गडचिरोली : महिलावर्गाला शिक्षणाची दारे उघडी करून देणाऱ्या क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत विविध सरकारी कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्कल ऑफिसमध्ये अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांच्यासह उपविभागीय अभियंता जीवन वासेकर व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पुजन करून आदरांजली वाहिली.

गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, उपकार्यकारी अभियंता सारिका पानतावणे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. महिलांनी सर्व क्षेत्रात प्रगती करणे हीच सावित्रीबाईंना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

फुले दाम्पत्य प्रतिष्ठानतर्फे अभ्यासिका

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून फुले दाम्पत्य प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने सार्वजनिक अभ्यासिका, वाचनालयाचे लोकार्पन करण्यात आले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष योगेश सोनुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेचे अध्यक्ष फुलचंद गुरनुले यांच्या हस्ते संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शिवदास मोहुर्ले होते. यावेळी
हरिदासजी कोटरंगे यांनी उपस्थितांकडून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून घेतले. पुरुषोत्तम लेनगुरे यांनी अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी सुखदेव जेंगठे, किरण शेंडे, प्रवीण मोहुर्ले, किशोर सोनुले, सुरज मांदाडे, क्रियांश सोनुले, प्रज्वल व मृणाल लेनगुरे, स्वरा मोहुर्ले, कांता लोनबले, प्रभा सोनुले, सारिका लोनबले यांनी सहकार्य केले.