शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

कोरेगावात अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या वतीने बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोहळा सहकार नेते प्रकाश सा.पोरेड्डीवार यांच्या हस्ते, तथा माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी वडसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास धोंडणे, भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पारधी, शंकर पारधी, मोहन गायकवाड, मुर्तीदाते चेतन पुरुषोत्तम मस्के, सरपंच कुंदा गायकवाड, उपसरपंच धनंजय तिरपुडे, गोपाल उइके व संपूर्ण गावकरी उपस्थित होते.

डॉ.साळवे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी नृत्यातून मांडली शिवगाथा – शिवपराक्रम

चातगाव येथील डॉ.साळवे नर्सिंग कॅालेजमध्ये बुधवारी शिवजयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थिनींनी नृत्यातून मांडलेली शिवगाथा आणि त्यातून दाखविलेल्या शिवपराक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सुरूवातीला संस्थाध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे यांनी शिवरायाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले. यावेळी स्टुडन्ट नर्सेस असोशिएशनच्या आकांक्षा आखाडे यांनी प्रास्ताविक भाषण करून महाविद्यालयाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राची माहिती दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे म्हणाले, स्वराज्याची निर्मिती, मराठी साम्राज्याची निर्मिती अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना ज्या जाज्वल्य देशभक्तीने, मराठी स्वाभिमानाने आणि हिंदू धर्माच्या रक्षणाकरिता त्यांच्या मनात असलेल्या धगधगत्या ज्वालेच्या रूपाने बघायला मिळते ती बाब संपूर्ण भारत देशाला प्रेरणादायी आहे. संस्थेच्या कार्यकारी प्राचार्य निकिता सडमेक, सानिया बेडकी, स्विटी नरोटे, सानिया सडमेक, शिल्पा गावडे, अनिल मेश्राम यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राविषयी मार्गदर्शन केले.

इंदू चिपेली, श्रीशा अल्लुर, सानिया सडमेक, स्विटी नरोटे, सानिया बेडकी, शिल्पा गावडे, आकांक्षा आखाडे यांनी नृत्याच्या माध्यमातून शिवगाथा सादर करून शिवपराक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी शुभांगी हलामी, खोमेश बोबाटे, आकांक्षा चौधरी, पियुष नंदेश्वर, फार्मेश भैसारे, वैशाली पिपरे, श्रद्धा कुनघाडकर, त्रिवेणी भानारकर, राज अल्लुर, नितीन अल्लुर, दीपक निकुरे, विनय कुमूर, काजल गव्हारे, दिव्या मडावी, साक्षी मडावी, सायली बुरे यांनी सहकार्य केले.

कुणबी सेवा समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त साहित्य वाटप

कुणबी सेवा समिती गडचिरोलीच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कारमेल शाळेच्या मागे समितीच्या नियोजित जागेत साजरी करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष अॅड.संजय ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून प्रतिमेची पूजा करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना अॅड.संजय ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य व त्यांचे व्यक्तिमत्व जगासाठी एक दीपस्तंभ आहे. शिवरायांचे राज्य खरे लोकाभिमुख राज्य होते. त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही जगासाठी प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर भागडकर तर आभार समितीचे सचिव आशिष ब्राम्हणवाडे यांनी मानले. या कार्यक्रमाला मनोहर हेपट, शेषराव येलेकर, चंद्रकांत शिवणकर, अनिल मंगर, लुमाजी गोहणे, राजेंद्र हिवरकर, दादाजी चुधरी, डॉ.देवेंद्र हिवसे, टिकाराम भोयर, वामनराव भोयर, जितेंद्र नायबनकर, अनिल रक्ताटे, वैशाली खेवले, अलका रक्ताटे, शीला गोहणे, काजल भागडकर, किरण भागडकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने गोविंदपूर येथे शिवरायांना अभिवादन

राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा कार्यालय गोविंदपूर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, कार्यालय प्रमुख मंगेश मुराडे व इतर पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खुणे कंन्स्ट्रक्शन कंपनीचे समस्त अधिकारी व कर्मचारी, तसेच एल.एल.डोंगरवार कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना डॉ.प्रणय खुणे व भारत खटी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केले. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विविध गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक रुपेश पिपरे, कार्यालय प्रमुख मंगेश मुराडे, शैलेश खवस व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

राजमुद्रा शिवराय ग्रुपच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा

आरमोरी तालुक्यातील कोरेगाव (रांगी) येथे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने व शिवाजी महाराजांवरील पोवाड्याच्या गजरात फेरी काढण्यात आली.

फेरीतील जयघोषातून तरुण व विद्यार्थ्यांनी शिवरायांसारखे घडावे असा संदेश देण्यात आला. या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कोरेगाव (रांगी) येथील सरपंच बालाजी गेडाम, तर अध्यक्षस्थानी पोलीस पाटील ओमप्रकाश मडावी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कांताराम जांभुळकर, पोस्टमास्तर आकाश वासनिक, जीवन मडावी, विशाल उसेंडी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परसराम मलगाम आदींनी उपस्थित राहून शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शिवरायांसारखे, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे बना, त्यांचे विचार अंगीकारा असा संदेश तरुण वर्गाला देण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्रशांत राऊत यांनी तर आभार खुशाल बावणे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.