प्रख्यात गायक आनंद शिंदे सोमवारी शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आलापल्लीत

'शिंदेशाही बाणा'चे करणार सादरीकरण

अहेरी : भीम, शिव व लोकगीतांचे प्रख्यात गायक आनंद शिंदे हे दि.19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आलापल्ली येथे ‘शिंदेशाही बाणा’या गितांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे. आलापल्ली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर सायंकाळी ठीक 7 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम करणार असून कार्यक्रमाच्या संयोजिका जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम आहेत.

आनंद शिंदे पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यात आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम व आयोजकांनी केले आहे.