गौरी-गणपत्ती उत्सवानिमित्त लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’चे वाटप सुरू

१०० रुपयांत चार प्रकारचे साहित्य

गडचिरोली : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त गौरी-गणपत्ती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करणे सुरू झाले आहे. याअंतर्गत प्रतिशिधापत्रिका 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चणादाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असे चार प्रकारचे साहित्य रास्तभाव दुकानामार्फत दिले जाणार आहे.

गडचिरोली तालुक्यातील साखरा येथे गडचिरोलीचे तहसिलदार महेंद्र गणवीर यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निरीक्षण अधिकारी जे.एल.बारदेवाड, पुरवठा निरीक्षक एस.एम.पतंगे प्रामुख्याने उपस्थित होते. पात्र शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिका संलग्न असलेल्या रास्तभाव दुकानातून सदर आनंदाचा शिधा प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार गणवीर यांनी केले आहे.