सिरोंचा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाग्यश्री आत्राम यांनी दुपट्टा देत केले स्वागत

सिरोंचा : तालुक्यातील पोचमपल्ली (कोटा) येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत त्यांचे स्वागत केले.

कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, तसेच युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सिरोंचा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले. यात गर्कापेठा ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या पोचमपल्ली (कोटा) येथील दशरथ रेड्डी बोम्मावार, शंकर बोले, नरेश दुर्गम, पेदामरण्णा मादरबोईना, संतोष मादरबोईना, श्रीनिवास गौरारपू, मलेश येया, मोहन डोंगरे, समय्या मारबोईना, मोंडी तलांडे, श्रीनिवास कोरके, नवीन गौरारपू आणि रघुपती तलांडी यांना भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दुपट्टा दिला.