गडचिरोली जिल्ह्यात ७९ शाळांनी दिला दहावीत १०० टक्के निकाल

सिरोंचा तालुका जिल्ह्यात आघाडीवर, नागपूर विभागात गडचिरोली तिसऱ्या स्थानी

गडचिरोली : राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत नागपूर विभागाचा निकाल ९२.०५ टक्के लागला आहे. त्यात ९२.५२ टक्के निकाल देऊन गडचिरोली जिल्ह्याने विभागात तिसरे स्थान पटकावले आहे. ९४.१५ टक्के निकालासह गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात बाजी मारली, तर ९३.६६ टक्के निकालासह भंडारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ७९ शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे हे विशेष.

यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ हजार ३७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात २४६४ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी घेतली. ६१५७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांमध्ये मुलांचे प्रमाण ९०.३९ टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.३९ टक्के आहे.
जिल्ह्यातील १२ तालुक्यांच्या निकालावर एक नजर टाकल्यास सिरोंचा तालुक्याने सर्वात चांगला निकाल दिला आहे. या तालुक्यातील ९५.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल भामरागड तालुक्याचा लागला आहे. या तालुक्यातील ८८.१८ टक्के विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले आहेत.

तालुकानिहाय निकालाचे प्रमाण असे आहे
सिरोंचा ९५.९७ टक्के, कुरखेडा ९३.८९ टक्के, चामोर्शी ९३.५१ टक्के, देसाईगंज ९३.०६ टक्के, अहेरी ९२.७४ टक्के, गडचिरोली ९२.३७ टक्के, एटापल्ली ९१.७४ टक्के, आरमोरी ९१.७१ टक्के, मुलचेरा ९०.८९ टक्के, धानोरा ९०.७३ टक्के, कोरची ८९.५५ टक्के, आणि भामरागड ८८.१८ टक्के असा तालुक्यांचा निकाल आहे.

या शाळांनी दिला १०० टक्के निकाल
श्रीमती एस.पोरेड्डीवार हायस्कूल गोगाव, नवयुग विद्यालय गुरवळा, भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोली, स्व.सीताराम पाटील मुनघाटे हायस्कूल काटली, संजीवनी विद्यालय नवेगाव, गोंडवाना सैनिकी विद्यालय नवेगाव गडचिरोली, एकता निवासी मूकबधीर विद्यालय गडचिरोली, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा आनंदनगर, नवजीवन पब्लिक स्कूल, प्रज्ञा संस्कार कॅान्व्हेंट, विद्या विहार कॅान्व्हेंट हायस्कूल नवेगाव, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जिमलगट्टा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खमनचेरू, सेंट फ्रान्सिस इंग्लिश मिडियम स्कूल नागेपल्ली, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गड्डीगुडम, संत मानवदयाल विद्यालय अहेरी, भगवानराव हायस्कूल पेरमिली, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय मरपल्ली, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अहेरी, ग्लोबल मिडिया केरला मॅाडेल इंग्लिश मिडियम स्कूल, ग्रिनलँड इंग्लिश मिडियम स्कूल, माॅडेल स्कूल आलापल्ली, रिपब्लिक इंग्लिश मिडियम स्कूल, सरस्वती माध्यमिक विद्यालय पळसगाव, सरस्वती विद्यालय सिर्सी, पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल आरमोरी, यशवंत इंग्लिश मिडियम स्कूल, वत्सलाबाई वनमाळी स्कूल आॅफ स्कॅालर्स आरमोरी, राजे धर्मराव माध्यमिक आश्रमशाळा मन्ने राजाराम, जिल्हा परिषद हायस्कूल कोनसरी, शिवानी माध्यमिक विद्यालय नवेगाव (रै), विमलाताई ओलालवार माध्यमिक विद्यालय पेट्टाला, भगवानराव हायस्कूल ठाकरी, आकाश विद्यालय जयरामपूर, भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा गुंडापल्ली, लोकमान्य माध्यमिक विद्यालय मुरखेडा, भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय मुरखेडा, कारमेल अकॅडमी हायस्कूल चामोर्शी, नवोदय विद्यालय घोट, लिटिल हार्ट इंग्लिश मिडियम स्कूल, मोहम्मद शरीफ सौदागर मेमोरियल हायस्कूल देसाईगंज, युवक विद्यालय विहिरगाव, राधेश्यामबाबा विद्यालय कुरूड, लाल बहादूर विद्यालय डोंगरगाव, रेणुकाबाई उके विद्यालय शिवराजपूर, लोकसेवा माध्यमिक विद्यालय आमगाव, यशोदादेवी इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्यु.काॅलेज, सावित्रीबाई फुले दिव्यांग मुलींची निवासी शाळा, जेजानी स्कूल आॅफ स्काॅलर्स, लालशहा मडावी विद्यालय कारवाफा, जय परसापेन हायस्कूल मलांडा, मॅाडेल स्कूल मोहाली, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा तोडसा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जांबिया, विनोबा माध्यमिक आश्रमशाळा हेडरी, विनोबा आश्रमशाळा पंदेवाही, जय पेरसापेन माध्यमिक विद्यालय बुर्गी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्ली, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोरची, भगवंतराव हायस्कूल बोटेकसा, युवस्पंदन विद्यालय भिगपूर, बनपूरकर विद्यालय घाटी, मोहिनी हायस्कूल खेडेगाव, आवन हायस्कूल आंधळी नवरगाव, क्रांतीवीर नारायणसिंग उईके आदिवासी आश्रमशाळा वडेगाव, संस्कार पब्लिक स्कूल, भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा लगाम, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लोहारा, शहीद भगतसिंग हिंदी माध्यमिक विद्यालय गांधीनगर, ईश्वरचंद विद्यासागर माध्यमिक विद्यालय, मोहुर्ली, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा झिंगानूर, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बामणी, संत मानवदयाल विद्यालय रंगय्यापल्ली, डॅा.बी.आर.आंबेडकर विद्यालय नदीकुडा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा, डिस्नीलँड इंग्लिश मिडियम स्कूल गडचिरोली, मॅाडेल स्कूल सिरोंचा, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय शाळा, लक्ष्मीकांतय्या पब्लिक स्कूल, ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल सिरोंचा.