मध्यप्रदेशच्या मंत्र्यांनी केला व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

गुरूदेव हरडे आणि मनोज देवकुले सन्मानित

गडचिरोली : भाजपच्या वतीने आयोजित महाजनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रांतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील व्यापारी संमेलन ९ जून रोजी हॅाटेल लँडमार्क येथे झाले. यावेळी गडचिरोली व्यापारी असोशिएशनचे सचिव गुरुदेव हरडे आणि कोषाध्यक्ष मनोज देवकुले यांचा मध्यप्रदेशचे सहकारमंत्री डॉ.अरविंद भदौरिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी गुजरातमधील राज्यसभा खासदार रामजीभाई मौकरिया, खासदार अशोक नेते, वर्धेचे खासदार रामदास तडस, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली चिमूर लोकसभेचे निवडणूक प्रमुख किशन नागदेवे, आमदार कृष्णा गजबे, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री तथा गडचिरोली विधानसभा प्रमुख प्रमोद पिपरे, हेमंत राठी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाजप सरकार व्यापाऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याचे यावेळी डॅा.भदौरिया यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यापारी वर्गाला सांगितले.