अन् डीजेच्या तालावर महिला-पुरूषांसोबत आ.डॅा.होळी यांनीही धरला ठेका

रॅलीत सहभागी होऊन वाढविला उत्साह

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने युवक-युवती, महिला डीजेवर वाजणाऱ्या आदिवासी गाण्यांवर नृत्य करत होते. हे पाहून गडचिरोलीचे आमदार डॅा.देवराव होळी यांना आपला उत्साह आवरता आला नाही. त्यांनी त्यांच्यात मिसळून ठेका धरत नृत्य केले.

या रॅलीत आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने नृत्य करत होते. शहराच्या मुख्य मार्गाने ही रॅली जात होती. आ.होळी तेथून जात असताना ते थोड्या वेळासाठी या रॅलीत सहभागी झाले. आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी नृत्यही केल्याने युवकांनी एकच जल्लोष केला.