शिवाणीपाठला सल्ला गांगरा शक्ती स्थापना, गोंडी कलाकारांचा सत्कार व प्रबोधन

भाग्यश्री आत्राम यांची प्रमुख उपस्थिती

अहेरी : तालुक्यातील शिवाणीपाठ येथे सल्ला गांगरा शक्ती स्थापना व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचे समाजबांधवांनी उत्साहात स्वागत केले.

यावेळी सप्तरंगी ध्वजारोहण तथा सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम, तसेच सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठरलेल्या वेळेनुसार धार्मिक विधी व मठ पूजा, तसेच गोंडी सांस्कृतिक नृत्य व गोंडी कलाकारांचा सत्कार तथा प्रबोधन आदी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांत उशिरा का होईना, समाजाचा कार्यक्रम असल्याने ताईंनी उपस्थिती दर्शवून आदिवासी बांधवांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.