विभागीय योगासन स्पर्धेत प्लॅटिनमच्या विद्यार्थ्यांनी केले जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व

जिल्हास्तरिय शालेय स्पर्धेत ठरले अव्वल

गडचिरोली : युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये गडचिरोलीच्या प्लॅटीनम ज्युबिली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवत विभागीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये वयोगट १४ वर्षाखालील गटातून दुर्वा रवींद्र कुडकावार (प्रथम), आसावली विनोद ठोंबरे (द्वितीय), दिशा प्रदीप बिहाणी (तृतीय), दीक्षिता सत्यविजय मेश्राम (चतुर्थ) आणि याशिका विनोद सोयाग (पाचवी) आले. तसेच वयोगट १४ वर्षाखालील मुलांमध्ये कौस्तुभ गौरव हेमके (प्रथम), रिदमिक या योग प्रकारात १४ वर्षाखालील मुलींमध्ये सेजल अरविंद कापगते (प्रथम) आणि वयोगट १७ वर्षाखालील मुर्तीमध्ये फाल्गुनी सचिन नकले हिने प्रथम क्रमांक घेतला.

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा क्रीडा संकुल, जिल्हा कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे पार पडली. पंच म्हणून रजनी डोनाडकर, वसुधा बोबाटे आणि अनिल निकोडे यांनी काम पाहिले. जिल्हयातून सर्वात कठीण आसने करणारे विद्यार्थी हे फक्त प्लॅटिनम शाळेचे होते. त्यांनी योग शिक्षक डॅा.अनिल निकोडे यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव केला.

या यशाबद्दल प्लॅटिनम ज्युबिली स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे महासचिव अजिज नाथानी, प्रिंसिपल अनेता चार्ल्स यांनी विद्यार्थ्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.