काँग्रेसला विधानसभा निवडणुकीचे वेध, इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेणे सुरू

लवकर अर्ज करा, जिल्हाध्यक्षांचे आवाहन

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या विजयानंतर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार लोकांच्या मनातील असावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून राज्यभरात विधानसभानिहाय उमेदवारांची चाचपणीला सुरुवात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही ईच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी (ST राखीव), गडचिरोली (ST) आणि अहेरी (ST) या विधानसभांकरीता काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे सुरु झाले आहे.

संबंधित उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा काँग्रेस कार्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली येथे भरावे. उमेदवारी अर्जाचा नमुना जिल्हा काँग्रेस कार्यालयात उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.