गडचिरोली : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार शनिवार, दि.6 रोजी गडचिरोलीत मुक्कामी येणार आहेत. दिवसभर चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावून सायंकाळी ते आपल्या गडचिरोली येथील निवासस्थानी मुक्कामी येणार आहेत.
शनिवारी सकाळी नागपूर येथून ब्रम्हपुरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यानंतर व्याहाड खुर्द येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित खासदार डॅा.नामदेव किरसान आणि खा.प्रतिभा धानोरकर यांच्या सत्कार समारंभाला ते उपस्थित राहतील. सायंकाळी 7 वाजता गडचिरोलीत पोहोचतील.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली रणनिती आखणे सुरू केले आहे. त्यादृष्टीने ना.वडेट्टीवार संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्याची शक्यता आहे.