देसाईगंज : भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्राची भाजपची संघटनात्मक बैठक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या देसाईगंज (वडसा) येथील जनसंपर्क कार्यालयात झाली. अनुसुचित जाती / जनजाती संसदीय समितीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि गडचिरोली-चिमूर लोकसभेचे समन्वयक अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. याप्रसंगी संघटनेबाबत उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने प्रवासी कार्यकर्ता श्रीनिवास, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, जिल्हा सचिव तथा महिला मोर्चाच्या नेत्या सीमा कन्नमवार, देसाईगंजचे शहराध्यक्ष सचिन खरकाटे, तालुका महामंत्री वसंत दोनाडकर, योगेश नाकतोडे, शहर महामंत्री चैतन्यदास विधाते, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन वानखेडे, आयटी सेलचे प्रमुख ओंकार मडावी, कृउबाचे संचालक हिरालाल शेंडे, नरेश विठ्ठलानी, दीपक झरकर, शामराव अलोने, आदित्य मिसार, कैलाश पारधी तसेच शक्ती केंद्र प्रमूख, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.