प्लॅटिनम ज्युबिली स्कूलची शरयू करेवार राज्यस्तरीय स्पर्धेत करणार तिरंदाजी

मेहनत आणि चिकाटीने मिळवले स्थान

गडचिरोली : येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि ज्यु.कॅालेजमधील दहावीची विद्यार्थिनी शरयू नारायण करेवार ही राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. वरोरा येथे झालेल्या 19 वर्षाखालील विभागीय स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

शाळेचे महासचिव अझिझ नाथानी यांनी शरयूचे कौतुक केले. शरयूचा आत्मविश्वास आणि समर्पण इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिचे हे यश एक महत्वपूर्ण टप्पा आहे. अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना पुढे आणण्यासाठी प्लॅटिनम ज्युबिली स्कूल नेहमीच मदत करेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शरयू भविष्यातील विविध स्पर्धांमध्ये चांगले यश मिळवेल, असा विश्वास प्राचार्य रहीम अमलानी यांनी व्यक्त केला.