सरकारची कामे, अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- पोरेड्डीवार

आमगावात भाजपची तालुकास्तरीय बैठक

देसाईगंज : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. आमगावच्या श्रीराम मंदिरात बुधवारी झालेल्या या बैठकीत ज्येष्ठ सहकार नेते तथा भाजपचे आरमोरी विधानसभा प्रमुख प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी मार्गदर्शन केले.

आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात सदर बैठकीचे नियोजन केले होते. राष्ट्रपतींचे अभिभाषण व राज्यातील युती सरकारच्या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी बुधवार, दि.10 जुलै रोजी आमगाव येथील श्रीराम मंदिर येथे ही बैठक संपन्न झाली.

यावेळी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना, थकीत वीज बिल माफी, मुलींसाठी मोफत शिक्षण, मोफत वीज, मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी, महिला, युवा, अपंग, शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींची माहिती कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर, गावागावात पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले. महत्वाचे म्हणजे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संघटनात्मक चर्चा करून लोकसभा निवडणुकीमध्ये बुथनिहाय झालेल्या मतदानाचा आढावा घेऊन ज्या बुथवर भारतीय जनता पक्षाला कमी प्रमाणामध्ये मत मिळालेले आहेत त्या बुथवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून बुथ सशक्तीकरण करण्याचे आवाहन प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते रामभाऊ पडोळे गुरूजी, गडचिरोली जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाल उईके आदींनी मार्गदर्शन केले.

या बैठकीला पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाल उईके, तालुका अध्यक्ष (ग्रामीण) सुनील पारधी, तालुकाध्यक्ष (शहर) सचिन खरकाटे, आमगाव येथील ज्येष्ठ नागरिक तथा श्रीराम मंदिराचे विश्वस्त ठाकरे, तसेच देसाईगंज तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी तर आभार प्रदर्शन शहर तालुकाध्यक्ष सचिन खरकाटे यांनी केले.