गडचिरोली : विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी अहेरी विधानसभा मतदारसंघात आणखी एक अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे अहेरीत प्राप्त नामांकनांची संख्या दोन झाली आहे. मात्र गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघात आतापर्यंत एकही नामांकन आलेले नाही. असे असले तरी तीनही मतदार संघात 93 अर्जांची उचल करण्यात आली आहे.
आ.कृष्णा गजबे सोमवार, दि.28 ला, तर धर्मरावबाबा आत्राम दि.29 ला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
23 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 3 व्यक्तींनी 10 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 6 व्यक्तींनी 16 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 6 व्यक्तींकडून 10 अर्जाची उचल केली आहे. जिल्ह्यात दोन दिवसात एकूण 93 नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबरपर्यंत आहे.