सिरोंचा : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) देशव्यापी सदस्यता नोंदणी मोहिमेला गती देण्यासाठी सिरोंचा तालुका व शहर यांच्या वतीने गुरूवारी (दि.2) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सिरोंचा नगर पंचायत परिसरात पार पडलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते झाले.
यावेळी अशोक नेते यांनी भाजपचा दुपट्टा स्वीकारून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना या सदस्यता नोंदणी मोहिमेचे राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक महत्व विषद केले. भाजपची विचारसरणी देशाच्या प्रगतीसाठी निर्णायक आहे. सदस्यता नोंदणी मोहिमेद्वारे नवीन सदस्यांना पक्षाच्या ध्येय-धोरणांशी जोडून त्यांना पक्षाच्या कार्यसंस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही कार्यशाळा कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असे ते म्हणाले.
या कार्यशाळेत प्रामुख्याने मंचावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जेष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला, तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष संतोष पडर्लावार, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार, जिल्हा सचिव सतीश गंजीवार, जेष्ठ नेते रहिमभाई, सितापती गटटू, सरपंच श्रीमती मड़्डे, भाष्कर गुडमेटला, तसेच सिरोंचा शहर व तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
मा.खा.अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना उत्साहाने आणि जोमाने या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे त्यांनी सांगितले. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी झोकून देऊन कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा
या कार्यशाळेमुळे भाजपच्या संघटनात्मक कार्याला बळकटी मिळणार आहे. सिरोंचा तालुका आणि शहरामध्ये सदस्य नोंदणी मोहिमेला नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि भाजपच्या विस्तारासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे सिरोंचा तालुक्यातील भाजप संघटन अधिक मजबूत होईल आणि पक्षाच्या ध्येय-धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.