गडचिरोलीत भाजपच्या ‘घर चलो अभियाना’त प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा सहभाग

दुकानदारांना वाटली पत्रके, पहा व्हिडीओ

गडचिरोली : भाजपच्या महिला आघाडीच्या देशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपच्या ‘मेरी माटी मेरा देश’ आणि ‘घर चलो अभियाना’त मंगळवारी गडचिरोली शहरात प्रत्यक्ष सहभाग घेतला. याशिवाय जनसंवाद कार्यक्रमांतर्गत भाजपच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात जाणार असून या दौऱ्याची सुरूवात माझ्या आवडत्या गडचिरोली जिल्ह्यातून करत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

गडचिरोलीत आगमन होताच भाजप व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन परिवारासह स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम, प्रदेश चिटणीस रेखा डोळस, महिला प्र.जिल्हा अध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा सचिव गिता हिंगे, प्रदेश सरचिटणीस (एस. टी.मोर्चा) प्रकाश गेडाम, तसेच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होते.

शहराच्या मार्केट परिसरात चित्रा वाघ यांनी पदाधिकाऱ्यांसोबत पायी फिरून मार्केट परिसरात दुकानदार, व्यापाऱ्यांना सरकारने केलेल्या कामाची पत्रके वाटली. त्यानंतर जनसंवाद कार्यक्रमात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, महिला प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, महिला प्रदेश चिटणीस रेखा डोळस, जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, प्रदेश सरचिटणीस (एस.टी. मोर्चा) प्रकाश गेडाम, महिला प्र.जिल्हा अध्यक्ष योगीता पिपरे, ओबीसी प्रदेशच्या संगीता रेवतकर, महिला आघाडीच्या गडचिरोली प्रभारी शालिनी डोंगरे, माजी जि.प.सदस्य लता पुंघाटी, जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, कविता उरकुडे, जिल्हा सचिव गिता हिंगे, माजी सभापती रंजिता कोडापे, रहिमा सिद्धिकी, रोशनी पारधी, पल्लवी बारापात्रे तसेच मोठ्या संख्येने महिला भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक रेखा डोळस यांनी तर संचालन योगीता पिपरे यांनी केले.