भामरागड : जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल अविकसित भामरागड भागात भारतीय जनता पक्षाच्या “घर चलो” विशेष सदस्यता नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात या अभियानाची उत्साहात सुरुवात झाली.
समर्थ भारत आणि विकसित भारतासाठी भाजपचा भाग बना, असे आवाहन यावेळी नेते यांनी नागरिकांना केले. या मोहिमेच्या माध्यमातून स्थानिक जनतेपर्यंत पक्षाची उद्दिष्टे आणि विकासाची दृष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अशी आहे सदस्य नोंदणी प्रक्रिया
ऑनलाइन नोंदणीसाठी 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल केल्यास नोंदणी करता येते. भामरागड हा अतिदुर्गम भाग असल्याने या भागात मोबाईलचे नेटवर्क राहात नाही. त्यामुळे विशेष फॉर्मद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवली गेली.
या कार्यक्रमाला भाजपाच्या जिल्हा व तालुका स्तरावरील विविध पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी, सहकार आघाडी, नगरसेवक आणि शक्ती केंद्र प्रमुख यांची उपस्थिती होती.
या अभियानाला जेष्ठ नेते व ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिशवास, भामरागडच्या नगराध्यक्ष रामबाई कोमटी महाका, तालुकाध्यक्ष अर्जुन अलाम, महामंत्री तपेश हलदार, ता.उपाध्यक्ष जाधव हलदार, नगरसेवक सरजू सेडमेक, माजी नगरसेविका रंजु सेडमेक, पोर्णिमा मडावी, लाहेरी शक्ती केंद्र प्रमुख दिनेश घोसरे, ता.उपाध्यक्ष राजेंद्र मडावी, ताडगावचे जेष्ठ नेते राजू तिर्थगीरवार, कमलेश अधिकारी तसेच भामरागडातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.