गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी

नऊ ईच्छुकांचे अर्ज, कोण बाजी मारणार?

गडचिरोली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे वेध सर्वांना लागले आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीनेही उमेदवार चाचपणीला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राकरीता काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविले होते. त्यात 6 ते 9 जानेवारीपर्यंत 9 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात सादर केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.

इच्छुक उमेदवारांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, माजी जि.प. सदस्य नंदू नरोटे, निलेंज मरस्कोल्हे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ.प्रणित जांभुळे, नारायण जांभुळे, हरिदास बारेकर यांनी आपला अर्ज जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे यांच्यामार्फत पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आहे.

यात डॅा.नामदेव किरसान यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असून दुसऱ्या नंबरवर डॅा.नामदेव उसेंडी यांचे नाव चर्चेत आहे.