– म्हणून मला १४ महिने जेलमध्ये काढावे लागले- माजी गृहमंत्री देशमुख

१०० कोटींच्या आरोपावर काय म्हणाले, ऐका

गडचिरोली : वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून भाजप इतर पक्षातील लोकांना फोडत आहे. याच पद्धतीने मलासुद्धा भाजपमध्ये येण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण मी जुमानले नाही. परिणामी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमविर सिंग यांना माझ्यावर १०० कोटी मागितल्याचा आरोप करायला लावला, असा खळबळजनक आरोप राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांनी केला. मी भाजपमध्ये गेलो असतो तर १४ महिने जेलमध्ये राहावे लागले नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीत गुरूवारी संध्याकाळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी देशमुख यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. कंत्राट पदभरती, जि.प.शाळांचे खासगीकरण अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, शहराध्यक्ष तथा माजी न.प.सभापती विजय गोरडवार, तालुकाध्यक्ष प्रदीप चुधरी, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, संजय कोचे यांच्यासह इतर पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.