अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम तीन दिवसांच्या दौऱ्यावर

उद्या गडचिरोलीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

गडचिरोली : अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे शुक्रवार, दि.19 रोजी दुपारी अहेरी येथील राजवाडा निवासस्थानी आगमन झाले. रविवारपर्यंत त्यांचा गडचिरोली, अहेरी, आलापल्लीत दौरा राहणार आहे.

शनिवार दि.20 रोजी सकाळी अहेरी येथून आष्टी-चामोर्शी मार्गे दुपारी 12 वाजता गडचिरोलीच्या शासकीय विश्रामगृहावर येतील. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला ते मार्गदर्शन करतील. सायंकाळी गडचिरोली येथून अहेरीला जातील. रविवारी सकाळी 11 वाजता आलापल्ली येथील सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून अहेरीला जातील. त्यानंतर दुपारी 2 वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथून चंद्रपूरमार्गे मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.