देसाईगंज तालुक्यातील कुरुड व कोंढाळा येथे ‘गाव चलो’ अभियानाचा शुभारंभ

खासदार नेते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

देसाईगंज : तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या कुरुड आणि कोंढाळा येथे भाजपच्या गाव चलो अभियानाचा शुभारंभ खासदार अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी कुरुड या गावातील झुरे मोहल्ल्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला, तर पारधी मोहल्ल्यातील वैराग्यमूर्ती राधेश्याम बाबा मंदिरातील मूर्तीला खा.नेते यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कुरुड येथील बुथ क्रमांक १३०, १३१, १३२ या बुथावर बैठक व भेट देऊन गावातील मुख्य रस्त्याने केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची पत्रके वाटप करण्यात आली. तसेच भिंतीवर कमल चित्र काढण्यात आले. याप्रसंगी बळीराजा चौकातील शिवजयंती उत्सव कमिटीच्या नवयुवकांशी चर्चा करून त्यांना शिवजयंती उत्सवाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.

मौजा कोंढाळा येथील श्री दत्त मंदिरात खा.नेते यांनी दर्शन घेऊन कोंढाळा येथील बुथ क्र.१९५ वर तसेच बुथ प्रमुख नवतरुण मंडळांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी युवा वीर मराठा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खा.अशोक नेते आणि आ.कृष्णा गजबे यांचे शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या प्रमुख गावातील भेटी व गाव चलो अभियानादरम्यान खासदारांसोबत आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णा गजबे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल, तालुका अध्यक्ष सुनील पारधी, तालुका महामंत्री वसंत दोनाडकर, बुथ प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य शंकर पारधी, ग्रामपंचायत सदस्य विलास भिलारे, बुथ प्रमुख भारत ढोरे , प्रदीप उरकुडे, विविध मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.