केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा

दिवाळी शुभेच्छा संदेशात खासदारांचे आवाहन

गडचिरोली : केंद्रातील भाजप सरकारसोबत राज्यातील महायुतीचे सरकार समन्वयातून अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. समाजातील सर्व घटकांसाठी या योजना फायदेशिर ठरणाऱ्या आहेत. त्यात आता विश्वकर्मा योजनेची भर पडली असल्यामुळे १२ बलुतेदार जातींमधील गोरगरीब, सामान्य नागरिकांना व्यवसाय उभारणीसाठी बळ मिळणार आहे. त्याचा लाभ घ्या, असे आवाहन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव अशोक नेते यांनी आपल्या दिवाळी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. आपल्या संदेशात त्यांनी नेमके काय म्हटले ते एेकण्यासाठी वरील व्हिडिओवर क्लिक करा.

(विविध मान्यवरांच्या दिवाळी शुभेच्छा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)