खासदार नेते यांच्या भेटीने गहीवरले बोदलीचे जेष्ठ कार्यकर्ते यादवराव निकोडे

जुन्या आठवणींना दिला उजाळा

गडचिरोली : आयुष्याच्या संध्याकाळी माणूस जीवनातील सुख-दु:खाच्या आठवणींमध्ये रमून जातो. पण त्या आठवणींचे साक्षीदार असणारे सोबत नसेल तर एकाकी पडतो. बोदली येथील यादवराव निकोडे हे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सध्या वयाची ९८ वर्षे पूर्ण केल्याने अंथरूणाला खिळले आहेत. ते आजारी असल्याची माहिती समजल्यानंतर खासदार अशोक नेते यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीने यादवराव गहिवरून गेले.

भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते म्हणून यादवराव यांची ओळख आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नसल्याची माहिती खासदार नेते यांना कळल्यानंतर त्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. खासदार नेते यांनी त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोदलीचे सरपंच आकाश निकोडे, नितीन कुनघाडकर, आशिष पंदिलवार, सुरेश राठोड, दतू सुत्रपवार, अभिजीत कोरडे उपस्थित होते.