क्रीडा क्षेत्रात युवकांनी नावलौकिक आणि करिअर बनवावे – अम्ब्रिशराव आत्राम

भवानीपूर येथे फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण

मुलचेरा : तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या भवानीपूर येथे जगदीश ढाली यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येते. मोठ्या उत्साहाने यात स्पर्धक चमू सहभागी होतात. यावर्षीच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षीय भाषणात बोलताना अम्ब्रिशराव म्हणाले, फूटबॉल खेळाने माणूस स्वतःची प्रगती करू शकतो, आपले भविष्य बनवू शकतो आणि आपल्या गावाचे, आपल्या जिल्ह्याचे व आपल्या देशाचे नाव उंचावर नेऊ शकतो. आपल्या क्षेत्रातील युवकांमध्ये खेळांच्या बाबतीत खूप क्षमता आहे. काही खेळाळूंनी तर आपल्या क्षेत्राचे नाव देश-विदेशात उंचावले आहे. मी आजपर्यंत आपल्या क्षेत्रातील युवा वर्गाला क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, मॅरेथॉन अशा अनेक खेळांसाठी प्रोत्साहन देत आलो आहे. माझ्याकडून त्यांना सहकार्यही करत असतो. अशा युवकांनी गाव पातळीपर्यंत मर्यादित न राहता, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करावा आणि आपले करिअर बनवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी युवकांना केले.

यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अम्ब्रिशराव यांनी कार्यकर्त्याच्या घरी भेट देऊन अल्पोपहार घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला.

फुटबॉल स्पर्धेत विजेत्या व उपविजेत्या संघाला अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानचिन्ह देऊन बक्षीस वितरण करण्यात आले. यात प्रथम बक्षीस 25 हजार रुपये देवनगर चमुने तर द्वितीय बक्षीस-15 हजार रुपये भवानीपूरच्या संघाने पटकावले.

या कार्यक्रमाला अहेरी इस्टेटचे अवधेशबाबा आत्राम, माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, माजी पं.स.सदस्य सुभाष गणपती, जिल्हा सचिव बादल शाह, अहेरी तालुका अध्यक्ष रवि नेलकुद्री, मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, महामंत्री निखिल हलदार, युवा मोर्चा अध्यक्ष संजीव सरकार, नगरसेवक दिलीप आत्राम, किशोर मल्लिक, गणेश गारघाटे, अक्षय चुधरी, गुलशन मलेमपल्ली, पवन आत्राम, उत्तम शर्मा तसेच भवानीपूर येथील गावकरी आणि फूटबॉल खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.