आता चामोर्शीतील जनसंपर्क कार्यालयातून खा.अशोक नेते करणार तक्रारींचे निवारण

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

चामोर्शी : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क व तक्रार निवारण कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. हे कार्यालय सर्वसामान्य, गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याचे दालन बनावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केली.

या सोहळ्याला प्रामुख्याने खासदार अशोक नेते, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अतुल देशकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, प्रदेश सदस्य रवींद्र ओल्लालवार, संयोजक प्रा.कादर शेख, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, आदिवासी आघाडीचे नेते संदीप कोरेत, संतोष तंगडपल्लीवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासह खासदार अशोक नेते, प्रशांत वाघरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना खा.नेते यांनी या कार्यालयामुळे माझे चामोर्शीकरांशी नाते अधिक घट्ट झाले असून येथून सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना निश्चितपणे न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समया पसुला आणि तालुक्यातील शेकडो नागरिक, महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे ना.मुनगंटीवार यांनी भाजपचा दुपट्टा घालून स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर यांनी, तर संचालन सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे यांनी केले. यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, शहर अध्यक्ष सोपान नैताम, प्रशांत येगलोपवार, रिंकू पालारपवार, बंगाली आघाडीचे पूर्व विदर्भ प्रमुख दीपक हलदर, रमेश अधिकारी, भाजपच्या नगरसेविका रोशनी वरघंटे, प्रेमा आईंचवार, कविता किरमे, मीनल पालारपवार, शिल्पा रॉय, भाजपचे युवा नेते भुवनेश्वर चुधरी, जेष्ठ नेते माणिक कोहळे, विनोद गौरकर, त्रियुगी दुबे, ओबीसी आघाडीचे नेते संजय खेडेकर, युवा नेते नरेश अल्सावार, नीरज रामानुजमवार, वासुदेव चिचघरे, प्रकाश सातपुते, राजू धोडरे, वासुदेव चिचघरे, विष्णू ढाली , विलास चरडूके, राजू झाडे, रेवनाथ कुसराम, यशवंत त्रिकांडे, राजू धोडरे, साई गव्हारे, अनिल बोदलकर, अतुल भिरकुरवार, रतन सरकार, दिवाकर कोहळे, रवी धोटे, भाविक आभारे, बंडू सातपुते, अशोक धोडरे, राजू वरघंटीवार, भास्कर बुरे, शेषराव कोहळे, निखिल धोडरे, जीवनदास भोयर, लक्ष्मण वासेकर, विनोद किरमे, अनिल आक्रेडवार, विकास मैत्र यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.