विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार उद्या गडचिरोलीत

काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा

गडचिरोली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली असताना दुसरीकडे काँग्रेसही कामाला लागली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार रविवारी गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा करणार आहेत.

ना.वडेट्टीवार रविवारी सकाळी ब्रह्मपुरी येथून गडचिरोलीतील रानफुल निवासस्थानी येतील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विभागीय कार्यकारिणीच्या नियोजनासंदर्भात ते स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतील.

विशेष म्हणजे काँग्रेसने नुकतीच लोकसभेसाठी ईच्छुक उमेदवारांची नावे बोलविली. त्यात समोर आलेल्या इच्छुकांच्या नावांवर या बैठकीत चर्चा होणार का, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.