दिलखुलास : ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची विशेष मुलाखत

कसा झाला यशस्वी जीवनप्रवास, ऐका हे किस्से

गडचिरोली : महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिस्तबद्ध कारभाराचा पायंडा घालणारे, राज्याच्या सहकार क्षेत्रावरही आपला प्रभाव पाडणारे, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार म्हणजे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व. नुकतेच त्यांना राज्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वोच्च अशा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मृदुभाषी, संवेदनशिलता, शिस्तप्रियता हे त्यांचे स्वभावगुण अनेकांनी पाहिले, अनुभवले. पण त्यांच्या आतापर्यंतच्या यशस्वी जीवनप्रवासातील काही किस्से, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत प्रभाव पाडणारे व्यक्ती कोण, विद्यमान राजकीय आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सामाजिक स्थितीवरील त्यांचे भाष्य, अशा विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकणारी त्यांची ही दिलखुलास मुलाखत खास ‘कटाक्ष’च्या वाचक-श्रोत्यांसाठी घेतली आहे, प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी.