Home पब्लिक प्रॉब्लेम कॅन्सरग्रस्त महिलेच्या उपचारासाठी छत्रपती सेनेकडून आर्थिक मदत

कॅन्सरग्रस्त महिलेच्या उपचारासाठी छत्रपती सेनेकडून आर्थिक मदत

चंद्रगिरे कुटुंबियांनी मानले आभार

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील आंबेशिवणी येथील किरण अनिल चंद्रगिरे ही 35 वर्षीय महिला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. घरची आर्थिक परिस्थीती हलाखीची असल्याने उपचारासाठी पैशाची चणचण निर्माण झाली. ही बाब छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांच्या लक्षात येताच त्यांनी चंद्रगिरे कुटुंबियांच्या घरी जावून उपचारासाठी आर्थिक मदत दिली. (खाली वाचा)

यावेळी छत्रपती सेनेचे जिल्हा प्रमुख यादवजी लोहंबरे, जिल्हा संघटक विनोद चापले, उपजिल्हा प्रमुख गोपाल मोंगरकर, जिल्हा समन्वयक दीपक लाडे, जिल्हा सचिव विलास मुळे, तालुका संघटक प्रशांत ठाकूर, विधानसभा संघटक अमित चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (खाली वाचा)

मौशीखांब मुरमाडी जि.प.क्षेत्रात दांडगा जनसंपर्क असल्याने छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार हे नेहमीच त्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात असतात. (खाली वाचा)

या क्षेत्रातील कोणत्याही समस्या असल्यास नागरिक त्यांच्याकडे धाव घेतात. अरविंद कात्रटवार हेसुध्दा नागरिकांच्या हाकेला तत्परतेने धावून जात समस्या सोडविल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रिद जोपासत त्यांचे कार्य सुरू असल्याने नागरिकांना त्यांचा आधार वाटतो. (खाली वाचा)

आंबेशिवणी येथील किरण अनिल चंद्रगिरे यांना कॅन्सर असल्याने त्यांच्यावर नागपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रगिरे कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची असल्याने पैशाची जुळवाजुळव कुठून करावी या चिंतेत कुटुंबिय सापडले. याबाबतची माहिती छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांनी कात्रटवार यांना दिली. (खाली वाचा)

गोरगरीबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले अरविंदभाऊ क्षणाचाही विलंब न करता आर्थिक मदतीसाठी सरसावले. (खाली वाचा)

आपल्या कार्यकर्त्यांसह आंबेशिवणी येथील चंद्रगिरे कुटुंबियांच्या घरी जावून त्यांनी कुटुंबियांकडे आर्थिक मदत सुपूर्द केली. एवढेच नाही तर पुढे सुध्दा आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देत चंद्रगिरे कुटुंबियांना आधार दिला. (खाली वाचा)

कठीण प्रसंगाच्या वेळी अरविंद कात्रटवार मदतीसाठी धावून आल्याने चंद्रगिरे कुटुंबियांनी व गावातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.