Home पब्लिक प्रॉब्लेम जिल्ह्यातील 30,788 शेतकऱ्यांना 15.39 कोटींची दिवाळी अग्रीम मदत

जिल्ह्यातील 30,788 शेतकऱ्यांना 15.39 कोटींची दिवाळी अग्रीम मदत

प्रत्येकी 5 हजार रुपये खात्यात जमा

गडचिरोली : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील 30 हजार 788 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दिवाळी अग्रीम मदतीपोटी राज्य शासनाकडून 15 कोटी 39 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार 5 नोव्हेंबर 2026 अखेर ही मदत वितरित करण्यात आली आहे. (खाली वाचा)

तांत्रिक अडचणींमुळे रक्कम जमा न झालेल्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांनाही लाभ दिला जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. (खाली वाचा)

राज्यातील 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक आधार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची ग्वाही दिली होती. (खाली वाचा)

त्यानुसार महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या समन्वयातून मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. सणासुदीच्या काळात शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे. (खाली वाचा)

काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते तपशिलातील त्रुटी किंवा अन्य कारणांमुळे मदतीची रक्कम जमा होण्यास विलंब झाला आहे. अशा अडचणींचे निराकरण करून संबंधित पात्र शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे. (खाली वाचा)

एकही पात्र दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. (खाली वाचा)

दिवाळी अग्रीम मदतीच्या वितरणावर शासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्येही मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे. (खाली वाचा)

ही अग्रिम भेट दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरली.