अहेरी : अहेरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आणि कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम आज शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करणार आहेत. यासाठी अहेरीसह एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आणि मुलचेरा तालुक्यातील कार्यकर्ते अहेरीत येण्याची शक्यता असल्याने मोठे शक्तीप्रदर्शन होणार आहे.
सकाळी 11 वाजता राजवाडा निवासस्थानावरून रॅली निघून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जाणार आहे. आपल्या सर्वांच्या साथीने मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तुमच्या विश्वासाचा, प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करायला अवश्य या, ही विनंती त्यांनी मतदारांना उद्देशून केली आहे.