गडचिरोली : जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराच्या दृष्टीने मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली सीआयआयआयटी (Centre for Invention, Innovation, Incubation and Training), गडचिरोली येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन येत्या 13 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होणारा हा मेळावा टाटा टेक्नॉलॉजीज, गोंडवाना विद्यापीठ आणि कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित औद्योगिक कंपन्यांकडून 400 हून अधिक पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे आयोजकांनी कळविले.
ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, उत्पादन, सीएनसी ऑपरेशन आणि औद्योगिक सेवा क्षेत्रातील कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. आयटीआय डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार विविध पदांसाठी रोजगाराची संधी मिळणार आहे.
नामांकित कंपन्यांचा सहभाग
या रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्स पुणे, अॅक्सिस ग्लोबल चेन्नई आणि आझाद इंजिनिअरिंग हैदराबाद या नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना 15 ते 22 हजार पर्यंत पगार दिला जाणार आहे.
नोंदणीसाठी युवकांना आवाहन
आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणी : https://tinyurl.com/CIIIT-Placement
CIIIT या साईटवर होईल. या रोजगार मेळाव्यामुळे गडचिरोलीतील अनेक युवकांना आपल्या कौशल्यांना योग्य दिशा देत उद्योग क्षेत्रात करिअरची नवी सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे.
































