अहेरी : येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अधिकारी आदित्य जीवणे यांची बीड येथे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून बढती होऊन त्यांच्या जागी कुशल जैन रुजू झाले. त्यांचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे व रियाज शेख यांनी बुधवारी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
उपविभागीय अधिकारी कुशल जैन हे मूळचे मध्यप्रदेश येथील जबलपूरचे असून 2022 च्या कॅडरचे आयएएस आहेत. परिविक्षाधीन अधिकारी म्हणून त्यांनी नागपूर येथे सेवा दिली आहे. त्यामुळे विदर्भाचा त्यांना बऱ्यापैकी अभ्यास आहे. अहेरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांना येणारी विधानसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.