कुरखेडा : देशभरात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी कुरखेडा तालुक्याच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत येथील भाजपा कार्यालयात शहर व ग्रामीण भागातील स्वच्छता सेवक माता-भगिनी, तसेच कामगार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य तथा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते स्वच्छता सेवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा गजबे, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, नगरसेवक ॲड.उमेश वालदे, शहराध्यक्ष सागर निरंकारी, जिल्हा सचिव रूपाली कावळे, सहकार नेते वसंतराव मेश्राम, प्रा.विनोद नागपूरकर, कृष्णा चंद्रमा, सुनीता दखणे, महिला आघाडी अध्यक्षा रजनीगंधा बनसोड, जयश्री मडावी, मेश्राम ताई, कविता खडसे, राकेश खुणे, तुषार कुथे, अंग्रेज कराडे, धर्मा दरवडे, भाग्यवान जनबंधू, बंटी देवढगले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मा.आ.कृष्णा गजबे म्हणाले, “अंत्योदयाचा विकास हेच भाजपचे ध्येय असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.” स्वच्छता सेवकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव फाये यांनी तर सूत्रसंचालन प्रा.विनोद नागपूरकर यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्वच्छता सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































