गडचिरोली : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या प्रचाराला गडचिरोली जिल्ह्यात वेग आला आहे. याच अनुषंगाने गडचिरोली शहर व ग्रामीण मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या बैठकीत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पदवीधर मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घ्याव्यात, तसेच महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी सर्वांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे आणि जिल्हा पदवीधर नोंदणी प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनीही पदवीधर मतदारांशी संपर्क वाढविणे, मतदार नोंदणीविषयक जनजागृती करणे आणि प्रचार यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीला नगराध्यक्ष ॲड.प्रणोती सागर निंबोरकर, शहराध्यक्ष तथा नगरपरिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, डॉ.चंदा कोडवते, न.प.सभापती सीमा कन्नमवार, नगरसेवक सुधाकर येनगंदलवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, न.प.सभापती हर्षल गेडाम, जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षा शेडमाके, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार, नगरसेविका शिल्पा गव्हारे, नगरसेवक विनोद देवोजवार, साक्षी बोलूवार तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































