गडचिरोलीतील चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली, नवीन अधिकारी येणार

कुमार आशीर्वाद

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून कार्यरत असणाऱ्या चार आयएएस अधिकाऱ्यांची दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये बदली झाली आहे. त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद हे सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून जात आहे. त्यांच्या जागी जव्हार येथील सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुषी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून येत आहेत.

अहेरीचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अंकित यांची जळगाव जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. एटापल्लीचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांची बदली धुळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॅा.मैनक घोष यांची बदली यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे. अहेरीचे प्रकल्प अधिकारी म्हणून वैभव दासू वाघमारे येत आहेत.