गडचिरोली : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दै.देशोन्नतीच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयाला रविवारी भेट दिली. यावेळी त्यांचा जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यालय प्रमुख प्रा.अनिल धामोडे आणि मनस्विनीच्या संयोजिका सुलभा धामोडे यांनी शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी देशोन्नतीचे वृत्तांकन आणि उपक्रमांचे कौतुक केले. मनस्विनी या महिलांसाठी असलेल्या व्यासपीठाने महिला सक्षमीकरणासाठी हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हलगेकर, आरमोरीचे माजी आमदार हरिराम वरखडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राकाँचे नेते नाना नाकाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, माजी प्रभारी जिल्हाध्यक्ष बबलू हकिम प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रा.धामोडे यांनी देशोन्नतीच्या १९ वर्षातील वाटचालीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.संध्या येलेकर यांनी तर आभार प्रा.डॉ.विना जंबेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी मनस्विनी मंचच्या संयोजिका सुलभा धामोडे, कोअर कमिटी सदस्य गायत्री सोमनकर, मनीषा महात्मे यांनी परिश्रम घेतले.